शहापुर तालुका हा पाच प्रमुख नद्यांचा परिसर असूनही सिंचनाखालील शेती क्षेत्र मर्यादित आहे. त्यामुळे कृषी विभागाचा मुख्य भर सिंचन सुविधा वाढवण्यावर आहे. विभागामार्फत शेततळे, ठिबक सिंचन, जलसंवर्धन योजना व शाश्वत पाणीसाठा वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आधुनिक शेती पद्धती, सेंद्रिय शेती, पीक विविधीकरण, नैसर्गिक शेती प्रशिक्षण शिबिरे, तसेच कृषी पर्यटनास प्रोत्साहन दिले जाते. गावपातळीवर कृषी सहाय्यकांमार्फत मार्गदर्शन केले जाते व ई-नाम प्रणालीद्वारे शेतमाल विक्रीस चालना दिली जाते. ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासाठी मजुरांना हंगामी रोजगार उपलब्ध करून देणे, तसेच महिला शेतकरी गटांना विशेष योजनांचा लाभ मिळवून देणे हेही विभागाचे उद्दिष्ट आहे.