महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे.
वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत.
पात्र नागरीकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरीष्ठांकडे प्रथम व द्वितीय अपिल करता येते. व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते.
ग्रामपंचायतीकडून कलम ३ अन्वये खाली नमूद केलेल्या सेवा पुरविण्यात येतात. सदर सेवे संदर्भातील माहिती https://rdd.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सदरच्या सेवा विहित केलेल्या मुदतीत न केल्यास अथवा त्याबाबतच्या तक्रारी असल्यास त्याचे निवारण खालील प्रमाणे करण्यात येते.
अ.क्र | सेवा | सेवा पूर्णविण्याचा कालावधी | हुद्दा | प्रथम अपिलीय अधिकारी | द्वितीय अपिलीय अधिकारी |
---|---|---|---|---|---|
1 | दारिद्र्य रेषेखाली (BPL) असण्याचा दाखला | 5 | ग्रामसेवक | सहाय्यक गट विकास अधिकारी | गट विकास अधिकारी |
2 | जन्म नोंद दाखला | 5 | ग्रामसेवक | सहाय्यक गट विकास अधिकारी | गट विकास अधिकारी |
3 | मृत्यू नोंद दाखला | 4 | ग्रामसेवक | सहाय्यक गट विकास अधिकारी | गट विकास अधिकारी |
4 | ग्रामपंचायतीकडून घेणे बाकी दाखला | 5 | ग्रामसेवक | सहाय्यक गट विकास अधिकारी | गट विकास अधिकारी |
5 | निराश्र असण्याचा दाखला | 20 | ग्रामसेवक | सहाय्यक गट विकास अधिकारी | गट विकास अधिकारी |
6 | विवाह नोंद दाखला | 4 | ग्रामसेवक | सहाय्यक गट विकास अधिकारी | गट विकास अधिकारी |
7 | नमुना ८ चा उतारा | 5 | ग्रामसेवक | सहाय्यक गट विकास अधिकारी | गट विकास अधिकारी |